पुण्याचा वाहनसंख्येमध्ये नवा विक्रम

पुणे शहरानं वाहनसंख्येच्या बाबतीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. शहरातील वाहनांची संख्या ३३ लाख ३७ हजार ३७० वर गेलीय. 

Updated: Jul 31, 2017, 08:30 AM IST
पुण्याचा वाहनसंख्येमध्ये नवा विक्रम title=

पुणे : पुणे शहरानं वाहनसंख्येच्या बाबतीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. शहरातील वाहनांची संख्या ३३ लाख ३७ हजार ३७० वर गेलीय. याचाच अर्थ पुण्यामध्ये प्रतिमाणशी किमान एक गाडी असल्याचं स्पष्ट झालय. 

मागील ५ वर्षांत पुण्यातील वाहनांची संख्या तब्बल ९ लाखांनी वाढलीय. २०१३ मध्ये पुण्यातील एकूण वाहनांची संख्या २४ लाख ४६ हजार ६९४ इतकी होती 
२०१७ मध्ये हा आकडा ३३ लाख ३७ हजार ३७० वर गेलाय. 

पुणे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून ही माहिती समोर आलीय. पुण्यातल्या एकूण वाहनांपैकी 75 टक्के वाहनं दुचाकी आहेत.