पॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भनिरोधक गोळी देऊन असेच संबध ठेवण्याची धमकी

Minor Girl Rape: आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 16, 2023, 12:05 PM IST
पॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भनिरोधक गोळी देऊन असेच संबध ठेवण्याची धमकी title=

Minor Girl Rape: अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी मुलगी पोलीस अकादमीत ट्रेनिंग घेत होती. त्याच ठिकाणी आरोपीदेखील ट्रेनिंगला होता. ट्रेनिंगदरम्यान दोघांची एकमेकांशी ओळख झाली. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. 

असे असताना आरोपीने माझ्या इच्छेविरोधात मला लॉजवर नेऊन पॉर्न व्हिडीओ दाखवले आणि बलात्कार केल्याची फिर्याद तरुणीने दाखल केली आहे. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आरोपी अनवॉन्टेड ७२ ही गर्भनिरोधक गोळी खायला देत असे.

यानंतर पोलिसांनी 35 वर्षीय तानाजी कांबळेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तो मूळचा कोल्हापुरच्या आजरा जिल्ह्यातील कुतूर गावचा आहे. सहकारनगर चे पोलीस उपनिरीक्षक राजगुरू यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत. 

बसमध्ये दिवसाढवळ्या तरुणीचा विनयंभग 

पुण्यात दिवसाढवळ्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर बसमधील सहप्रवाशांना मोठा धक्का बसला. पीएमपी प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याची घटना पौड रस्त्यावर घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाने हा प्रकार केल्याने याची भीषणता अधिकच असल्याचे दिसून येत आहे. 

पोलिसांकडे तक्रार देणाऱ्या फिर्यादी तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. खासगी शिकवणीहून ती पीएमपी बसने घरी जाताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने ती घाबरली होती. फिर्यादी तरुणी घरी बसने घरी चालली असताना आरोपी तिच्या बाजूला येऊन बसला. त्यानंतर त्यानंतर त्याने अश्लील वर्तन करायला सुरुवात केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात असताना त्याने तिचा पाठलाग सुरु केला. यामुळे तरुणीला आणखीनच धक्का बसला. 

अश्लील चाळे आणि गैरवर्तन केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोस्को), तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.