कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम चालू असलेली इमारत एका बाजूला अचानकपणे झुकल्याचा प्रकार समोर झाला आहे. मंगळवारी रात्री हा सगळा प्रकार घडला. हा सगळा प्रकार समजताच आजूबाजूचे लोक परिसरात जमा झाले होते. इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांची चांगलीच धावळप उडाली. या घटनेची दाखल तातडीने घेऊन अग्निशामक दलाल आणि पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर इमारतीला तात्पुरता आधार दिला होता. यानंतर इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे.
वाकडमधली ही इमारत कधी ही खाली कोसळू शकते, अशी भीती स्थानिकांना होती. त्यामुळे रात्रीच अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत स्थानिकांनी कळवलं. पोलिसांनी प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन पाहून केली असता, स्थानिक दिलेल्यानुसार माहितीनुसार ही इमारत एका बाजूला झुकली होती. यानंतर महापालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची येऊन पाहणी केली.
हे बांधकाम वाय पद्धतीचे म्हणजेच चारऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आल्यानं अशी परिस्थिती उदभवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. तळमजला अधिक तीन मजले या बांधकाम पद्धतीवर उभारणे जीवघेणे ठरणार, असा निष्कर्ष रात्री काढण्यात आलेला होता. पण तातडीनं काहीच निर्णय घेणे शक्य नसल्यानं, तूर्तास इमारत पोकलेनच्या सहाय्याने सरळ करण्याचे प्रयत्न करण्यात आले. तसेच खालून देखील आधार देण्यात आला होता.
वाकडमधील इमारत पडण्याचे काम सुरु
पिंपरी चिंचवड मधील वाकड या ठिकाणी बांधकाम सुरू असलेले इमारत अखेर महापालिकेने पाडायला सुरुवात केली आहे. वाय आकाराच्या दोन पिलर वर उभी असलेली ही तीन मजली इमारत झुकल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केल्यानंतर ती पाडण्याचा निर्णय घेतला त्यानुसार ती इमारत पाडायला सुरुवात करण्यात आलेली आहे.
दरम्यान, इमारतीत अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचं, चुकीच्या पद्धतीने स्ट्रक्चर उभारल्याचं दिसून येतंय. ही डोळेझाक स्थानिकांच्या जीवावर बेतणारी होती. म्हणूनच पालिकेकडून आता चौकशीचा फास आळवला जातोय. चौकशीनंतर आर्किटेक, बिल्डर आणि परवानगी देण्याऱ्या अधिकाऱ्यापैकी नेमकी कोणावर आणि काय कारवाई होणार? की त्यांना अभय दिलं जाणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.