प्रशासन पुन्हा नापास? पाण्यात अळ्या सापडल्यानं नागरिकांना ताप, जुलाब आणि उलट्यांचा त्रास

Pune news: सध्या राज्याच्या अनेक भागात पाण्याचा प्रश्न नागरिकांना (citizens) सतावतो आहे. रोज पाणी मिळेल की नाही अशी शक्यता नसतानाही राज्यातील अनेक दुर्गम भागात पाण्याच्या (water problem) समस्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे.

Updated: Dec 2, 2022, 09:56 AM IST
प्रशासन पुन्हा नापास? पाण्यात अळ्या सापडल्यानं नागरिकांना ताप, जुलाब आणि उलट्यांचा त्रास  title=
bhor polluted water

निलेश खारमारे, झी मीडिया, पुणे: सध्या राज्याच्या अनेक भागात पाण्याचा प्रश्न नागरिकांना (citizens) सतावतो आहे. रोज पाणी मिळेल की नाही अशी शक्यता नसतानाही राज्यातील अनेक दुर्गम भागात पाण्याच्या (water problem) समस्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. पाणी कपातीची तर डोकेदुखी (headache) आहेच पण त्याचबरोबर आता एका नव्या समस्येनं नागरिकांच्या मन:स्तापात भर घातला आहे. ही समस्या आहे ती म्हणजे पाण्यातील अळ्यांची (bacteria in water). एकीकडे पाणी उपलब्ध नसताना नागरिकांची वेगळी चिंता असायची परंतु आता पाणी मिळत असूनही त्यात अळ्या सापडल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. पुण्याच्या भोर शहरात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पाण्यात आळ्या तर सापडल्याचं परंतु ही पाणी प्यायल्यानंतर अनेकांना जुलाब आणि तापाची (fever) समस्या उद्भवू लागली. (pune news citizens living in bhor facing problem of polluted water fever vomit loose motions)

अनेकांना जुलाब, उलट्या आणि ताप अश्या समस्या वाढू लागल्यानं नागरिकांमध्ये शंका उपस्थित झाली आणि पाहणी केली असता पाण्यात बारीक आळ्या सापडल्या असून पाणी दूषित असल्याचं समोर आलं. या मुद्द्यावरून शहरात अनेक शंकाकुशंका आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. घडल्याप्रकारामुळे शहरातील जलशुद्धीकरण केंद्राबाबत अनेक नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे. नगरसेवकांची यामागे काय भुमिका आहे याचीही चर्चा सुरू झाली आहे. याबाबत योग्य ती काळजी घेऊन पाण्याचा शुद्ध पुरवठा (clean water supply) व्हावा आणि त्यातून कुणाच्या शरीराला त्रास होऊ नये अशी मागणी साहजिकच जोर धरतेय. घडला प्रसंग पाहून शहराच्या पालिका प्रशासनाकडून (municipality) जलशुद्धीकरण केंद्र स्वच्छ आणि टापटीप करण्याचे त्वरित आदेश देण्यात आले आहेत. 

हेही वाचा - सकाळी उठल्यानंतर 'ही' काम केल्यास लक्ष्मी देवी राहतील प्रसन्न; जाणून घ्या

नक्की काय घडला प्रकार? 

हा प्रकार भोर (bhor) तालुक्यात घडला आहे. परंतु याचे प्रमुख केंद्र कुठेतरी दुसरीकडेच होते. शहरातील वाघजाई नगर आणि पिराचामळा परिसरात पाण्यात अळ्या आढळल्या आहेत. भोर शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिण्याच्या पाण्यात आळ्या आढळून आल्या आहेत. मागील दोन दिवसांपासुन दूषित (polluted water) पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या आहे. अक्षरशः घरातील हंड्यांमध्ये पांढऱ्या रंगाच्या लहान लहान आळ्या दिसून येत आहेत. त्यामुळे अनेकांना जुलाब, उलट्याचा त्रासही होतोय. शहरातील वाघजाई नगर आणि पिराचामळा परिसरातील नागरिकांना हे बाब निदर्शनास आणली आहे. तात्काळ पालिका प्रशासनाने जलशुद्धी केंद्राची पाहणी करून संपुर्ण जलशुद्धी केंद्र स्वच्छ आणि औषधं फवारणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

स्वत:ची काळजी घेणे आवश्यक 

तुमच्याही शहरात असा त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा कारण पाण्यातून दूषित जीवाणू, विषाणू आपल्या शरीरात गेल्यास त्यानं आपल्या शरीराला त्रास होण्याची शक्यता 99 टक्क्यांनी वाढते तेव्हा लक्षात घ्या की पाणी शक्यतो पिऊन प्यावे आणि जिथे वॉटर फिल्टर (water filter) असेल तिथूनच पाण्या पिण्यासाठी प्यावे. कुठेही जाताना पाणी पित असाल तर पाण्याला वास येत नाही ना हे तपासून घ्यावे अन्यथा बाहेरच्या पाण्याचाही दुष्पपरिणाम (side effects) तुमच्यावर होऊ शकतो. पाण्याची बातमी विकत घेत असाल तर त्यावरची मॅन्यूफॅक्चरिंग डेट तपासून पाहा. ती अगदी 1-2 वर्ष जूनी असेल तर ते पाणी घ्यायचे शक्यतो टाळा आणि जवळची तारिख असणारी बाटली घ्या. शक्यतो बाहेर नळावरचे पाणी जास्त पिणं टाळा.