रामदास आठवलेंच्या कवितेचं 'बजेट' चुकलं

कविता फसल्याचा अंदाज आठवलेंना आला आणि त्यांनी कवितेचा नाद सोडून दिला..

Updated: Feb 2, 2020, 08:38 PM IST

पुणे : शीघ्र कवी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ओळख आहे. झटपट चारोळ्या करण्यात त्यांचा हात कुणी धरणार नाही. कविता करुन ते जाहीर कार्यक्रमांमध्ये रंगत आणतात. पण कधी कधी कवींचीही पंचाईत होते. पुण्यातल्या एका कार्यक्रमात रामदास आठवलेंची कविताच फसली.

बजेटवर त्यांनी कविता करावी अशी फर्माईश माध्यम प्रतिनिधींकडून झाली. आठवलेंच्या कवितेची सुरुवात शानदार झाली. पहिलं यमक जुळलंही पण दुसरं यमक काही जुळता जुळेना.शेवटी कविता फसल्याचा अंदाज आठवलेंना आला आणि त्यांनी कवितेचा नाद सोडून दिला. नक्की झालं काय ते तुम्हीच पाहा.

आठवलेच्या कवितांनी त्यांच्या संसदेतील भाषणांसोबत राजकीय मंचही गाजवले आहेत. आठवलेंच्या कविता आवडणारा एक मोठा वर्ग राज्यात आहे.

सामान्य नागरिकच नव्हे तर मोठंमोठे राजकारणी देखील आठवलेंच्या कवितेचे चाहते आहेत.

सध्यस्थितीत घडत असलेल्या प्रसंगावर आधारित कविता रचण्यात त्यांचा हातखंडा आहे.

पण हा प्रयोग कधीकधी फसतो हे आजच्या कवितेचं बजेट चुकल्याने पुन्हा लक्षात आलं आहे.