शीतल महाजनने नऊवारी साडी नेसून केलं स्काय डायविंंग

अॅडवेंचरची खास आवड असणारी व्यक्ती काहीही करू शकतात. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 15, 2018, 11:03 AM IST
शीतल महाजनने नऊवारी साडी नेसून केलं स्काय डायविंंग  title=

मुंबई : अॅडवेंचरची खास आवड असणारी व्यक्ती काहीही करू शकतात. 

पुण्यातील शीतल राणे महाजनने थायलंडमध्ये सोमवारी अनोखा विक्रम रचला आहे. स्कायडायविंग करणं हेच धाडसाचं काम आहे. त्या धाडसासोबत अनोखा प्रयत्न शीतलने केलं आहे. शीतलने चक्क गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसून स्कायडायविंग केलं आहे. स्काय डायव्हिंग या साहसी खेळामध्ये जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या पद्मश्री शीतल महाजन यांनी अनोखा विक्रम केला आहे.

35 वर्षाच्या या धडाकेबाज महिलेने सांगितलं की, भारतीय महिला फक्त आपल्या रोजच्या दिनचर्येतच साडी नेसते असं नाही तर ती स्कायडायविंग करण्यासारख्या जोखमी कामात देखील ती नऊवारी साडी चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. तसेच पद्मश्री विजेता आणि जुळ्यांची आई असलेली शीतल राणे महाजन यांनी 18 वा राष्ट्रीय स्तराचा हा रेकॉर्ड केला आहे.