औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात एमआयएम नगरसेवक आणि आरटीओ अधिकारी यांच्यात चांगलाच राडा झालाय. गाडी का पकडली याचा जाब विचारण्यासाठी एमआयएम नगरसेवक विलास एडके त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी नगरसेवक आणि अधिकारी संजय मैत्रेवार यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर जोरदार राडा झाला.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याने नगरसेवकाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी थेट अधिकाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. यात अधिकाऱ्याने झापड मारली आणि त्यानंतर सगळेच अधिकारी भिडल्याचं स्पष्ट दिसतंय.