मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रसह अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाज आजही महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर वरुणराजची कृपा कायम राहणार आहे. त्यात मराठवड्यातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Updated: Aug 21, 2017, 09:56 AM IST
मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रसह अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम title=

मुंबई : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाज आजही महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर वरुणराजची कृपा कायम राहणार आहे. त्यात मराठवड्यातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यताय. आज सकाळी सहापर्यंत मुंबईशहरात 94.36 मिलीमीटर, पूर्व उपनगरात १०० मिलीमीटर, पश्चिम उपनगरात ११० मिलीमीटर पावसाची नोदं करण्यात आली आहे.

दरम्यान ११.४९ मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. भरतीच्यावेळी ४.६८ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास भरतीच्या काळा मुंबईतल्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.