भाजप खासदार बृजभूषण यांना राज ठाकरे यांनी सुनावले

Raj Thackeray's attack on BJP MP Brijbhushan Singh : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या आव्हानालाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या सभेत उत्तर दिले आहे. एक कुणीतरी खासदार उठतो आणि ...

Updated: May 22, 2022, 02:51 PM IST
भाजप खासदार बृजभूषण यांना राज ठाकरे यांनी सुनावले title=

पुणे : Raj Thackeray's attack on BJP MP Brijbhushan Singh : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या आव्हानालाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या सभेत उत्तर दिले आहे. एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, असे खडेबोल राज यांनी यावेळी सुनावले. पण एक लक्षात घ्या चुकीचा पांयडा पडत आहे. राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, यातून चुकीचे पायंडा पडत आहेत, गुजरातमधून कोणाला माफी मागायला लावणार आहात ते सांगा. 

एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्य आहे का... याला अनेक पापुद्रे आहेत. मला सगळं सांगणं शक्य नाही. दौरा रद्द झाल्याने अनेक जण माझ्यावर टीका करत आहेत. मी शिव्या खायला तयार आहे.

अयोध्येचा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. अयोध्या दौरा हा कार्यकर्त्यांना केसेसमध्ये अडकवायचा ट्रॅप होता. या दौऱ्याविरोधात रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केला. विरोध असताना जर मी हट्टाने गेलो असतो, तर माझ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले असते, मग ऐन निवडणुकीवेळी त्या केसेस चालवल्या असता आणि इथे कोणी नसतं, हा सर्व ट्रॅप होता. मी शिव्या खायला तयार आहे पण पोरांना अडकू देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. 

राजकारणामुळेच MIM पक्षाचा राक्षस आज उभा राहिला आहे. आणि निजामाच्या अवलादी महाराष्ट्रात वळवळ करतायत, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा लावण्याच्या भूमिकेचाही चांगलाच समाचार घेतला. तसेच यावेळी लेहमध्ये राऊत-राणा यांच्या भेटीबाबतही राज यांनी टीका करत त्यांचा उल्लेख ढोंगी असा केला.