मोदींच्या ह्या वक्तव्यावरून अंदाज येतोय का? युती होणार किंवा नाही?

नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. पण मोदींनी त्या भाषणात युतीचा साधा

Updated: Sep 19, 2019, 08:14 PM IST
मोदींच्या ह्या वक्तव्यावरून अंदाज येतोय का? युती होणार किंवा नाही? title=

नाशिक : नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. पण मोदींनी त्या भाषणात युतीचा साधा उल्लेखही केला नाही. उलट राममंदिराच्या मुद्द्यावरुन मोदींनी उद्धव ठाकरेंना टोलाच लगावला. राममंदिराच्या मुद्द्यावर अचानक अजब विधानं कशाला सुरू केली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून आणि शिवसेना तसेच युतीबद्दल एक शब्दही न काढल्यामुळे, शिवसेना आणि भाजप यांची राज्यात युती होईल किंवा नाही हे स्पष्ट होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

राज्यात अनेक दिवसांपासून सर्वांचं याकडे लक्ष लागलं आहे की, भाजप शिवसेना यांची युती होणार किंवा नाही. भाजप आणि शिवसेनेत आरे, नाणार आणि नारायण राणे यांना भाजप प्रवेश यावर धुसफूस सुरू आहे.

मात्र भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेते युती होणार असल्याने निक्षून सांगत असले, तरी एकमेकांविरोधातील वक्तव्यांवरून युती होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.