रणजितसिंह निंबाळकर यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा दिला राजीनामा

रणजितसिंह निंबाळकर यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे

Updated: Mar 23, 2019, 07:52 PM IST
रणजितसिंह निंबाळकर यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा दिला राजीनामा title=

सातारा : जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससोबत पटत नसल्याचे कारण देत पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, निंबाळकर हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार असतील अशी शक्यता आहे.  

 रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर

 राष्ट्रवादी काँग्रेसकडून सापत्नभावाची वागणूक सतत मिळत होती. तसेच आघाडी धर्म न पाळता विकासकामात माझ्यासह कार्यकर्त्यांना अडचणी निर्माण होत राहिल्या. त्यामुळे आपण पदाचा राजीनामा दिल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. सातारा जिल्हा हा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. २०९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी आहे. मात्र, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणे अपेक्षित होते. पण आतापर्यंत जिल्ह्यात तसे घडले नाही. कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त होत होता. तरीही कार्यकर्ते एकत्रित ठेऊन त्यांच्या परिने तालुक्यासह जिल्ह्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कामे केली, असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

राजीनामा पत्र

गेली १० वर्षे रखडलेली लोणंद - फलटण - बारामती रेल्वे जोडीला निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाचे अडलेले घोडे या प्रकल्पामुळे दुष्काळी भागात शेती अधिक सुपीक झाली असती. या प्रमुख बाबीबरोबर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काम न करण्याची व्यक्त केलेली भावना या सर्व बाबींचा विचार करून आपण राष्ट्रीय काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचा उल्लेख रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.