close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नागपुरात विवाहितेचे अपहरण करून बलात्कार

 अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना. 

Updated: Aug 23, 2019, 10:38 PM IST
नागपुरात विवाहितेचे अपहरण करून बलात्कार

नागपूर : विमनस्क रूग्णाने विवाहितेचे अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विवाहितेचे अपहरण करून बलात्कार करणारा आरोपी रिक्षा चालक असून शहजाद शेख शब्बीर शेख असे आरोपीचे नाव आहे.

पीडित विवाहित महिला शहरातील छत्रपती चौका सारख्या वर्दळीच्या परिसरातून  आरोपी रिक्षात बसली होती. मात्र, पीडितेला एकटी पाहून आणि तिची विमनस्क अवस्था हेरून नराधम रिक्षा चालकाने तिचा विश्वासघात करत रिक्षा निश्चित ठिकाणी थांबविला नाही आणि तिला छत्रपती चौकापासून बऱ्याच लांब असलेल्या उप्पलवाडी परिसरात नेले आणि दोन दिवस बलात्कार केला. तर, आरोपीच्या मित्रानेही पीडीतेसोबत लैंगिक चाळे केले.

अखेर गुरुवारी संध्याकाळी दोन्ही आरोपींची पीडितेला इतवारी रेल्वे स्टेशन जवळ सोडून पळ काढला. दोन दिवस बेपत्ता राहिल्यानंतर काल संध्याकाळी पीडित महिला तिच्या वडिलांच्या घरी परतली आणि तिने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. रात्री उशिरा कुटुंबियांसोबत तिने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी रिक्षा चालक शहजाद शेख आणि त्याचा मित्र मोहम्मद जावेद अन्सारीला अटक केली आहे...