रत्नागिरी : रत्नागिरीतील बहुतांश रस्त्यावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी ही केली जात होती.
तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह करून जाणा-या वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केलीय. . रत्नागिरीतील जयस्तंभ, मारूती मंदिर परिसरात वाहतूक पोलिसांच्यामार्फत तपासणी केली जात होती.
या तपासणीमध्ये अनेकांकडे गाडीची कागदपत्रं नव्हती तर काहींकडे गाडी चालवण्याचे लायसन्स नसल्याचं आढळून आलं. तर मद्यप्राशन करून वाहन चालवण्या-या चालकांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
तसेच काही ठिकाणी दंडही वसूल केला. तर तिकडे मुंबई गोवा महामार्गावरदेखील पोलिसांनी कारवाई केली.