शिर्डीच्या साईबाबा भक्तांसाठी खुशखबर; अखेर...

साईबाबा याच गुरूस्थान मंदिर परिसरातील निमवृक्षाखाली ध्यान धारणा करत होते त्यामुळे देश - विदेशातील लाखो भाविक मंदिरात (Mandir) आरती सुरू असते त्यावेळी गुरूस्थान निमवृक्षाभोवती परिक्रमा करतात. 

Updated: Nov 16, 2022, 07:10 PM IST
शिर्डीच्या साईबाबा भक्तांसाठी खुशखबर; अखेर...  title=

कुणाल जामदाडे, झी मीडिया: भाविक आणि ग्रामस्थांच्या मागणीस्तव शिर्डी साई समाधी (Shirdi SaiBaba)  मंदिराजवळ असलेल्या गुरूस्थान मंदिराला आरतीच्या वेळी प्रदक्षिणा घालण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी गुरूस्थान मंदिरास (Gursthan Mandir) आरतीच्या वेळी प्रदक्षिणा घालण्यास निर्बंध घालण्यात आले होते ते निर्बंध आता हटवण्यात आले आहेत.

साईबाबा याच गुरूस्थान मंदिर परिसरातील निमवृक्षाखाली ध्यान धारणा करत होते त्यामुळे देश - विदेशातील लाखो भाविक मंदिरात (Mandir) आरती सुरू असते त्यावेळी गुरूस्थान निमवृक्षाभोवती परिक्रमा करतात. साई समाधीच्या काचा काढुन हस्त स्पर्श करून दर्शनाची (Sai Baba Darshan) सुविधा सुरू झाल्यानंतर संस्थानने हा मोठा निर्णय घेतल्याची माहीती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. 

काही दिवसांपुर्वी घेतला होता हाही निर्णय - 

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान प्रशासन यांच्यात पार पडलेल्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. समाधी समोरील काचा आणि जाळीही हटवण्यात आल्या असून भक्तांना समाधीचेही थेट दर्शन घेता येईल असा तो निर्णय होता. या निर्णयामुळे साईभक्तही खुश झाले असून आता साईबाबांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा वाढू शकतात. व्दारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश दिला जाणार असल्याचा हा महत्त्वपुर्ण निर्णय होता आता साईबाबांची आरती सुरू असतानाही ही गुरूस्थानाभोवती भक्तांना दर्शन घेता येणार आहे. 

हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

साईबाबांच्या समाधी समोर लावण्यात आलेल्या काचांमुळे भक्तांना समाधीला (Samadhi) स्पर्श करुन दर्शन करता येतं नव्हतं. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. मात्र या काचांमुळे दर्शन घेता येत नसल्यामुळे नाराजी आणि संताप होता. मात्र मंदिर संस्थान प्रशासनाने घेतल्या या निर्णयाने आता पुन्हा एकदा बाबांच्या भक्तांना थेट समाधीचं दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.