मुंबई : अखेर दोन वर्षांनंतर नवरात्री उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात (Navratra puja 2022) साजरा होत आहे. सर्वत्र नवरात्री उत्सवाचा जल्लोष दिसत आहे. खासदार संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, जुना राजवाडा, भवानी मंडप, कोल्हापूर येथे तुळजाभवानी देवींची पूजा केली. यावेळी पत्नी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. कुटुंबासोबत पूजा केल्याचा व्हिडीओ संभाजी छत्रपतीच्या यांच्या फेसबूक अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. (sambhaji chhatrapati Navratra puja)
सध्या देवीच्या आकर्षक पूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी जुन्या राजवाड्यातील अंबादेवघरात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींची अश्वारूढ असलेली व सुगीच्या धान्याची ' आकर्षक ' पूजा करण्यात आली.' अशी माहिती देत त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. (sambhaji chhatrapati facebook)
प्रसन्न वातावारणात संभाजी छत्रपती यांनी देवीची पूजा केली. नवरात्रोत्सवाचा उत्साह मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. देवीच्या विविध रुपांची पूजा या नऊ दिवसांमध्ये बांधण्यात येते. अशाच सुरेख नवरात्रोत्सवानं सर्वांचं लक्ष वेधलं. (Video of Navratra puja )
खुद्द छत्रपती संभाजीराजे यांनीच या खास क्षणांचे आणि आकर्षक पूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहेा. व्हिडीओ पाहून आदिशक्तिच्या रुपांनी सर्वजण भारावले.