'ED, CBI ला बाजुला ठेवा, मग काडतूस दाखवतो', संजय राऊत यांचा फडणवीसांसह शिंदेवर हल्लाबोल

Sanjay Raut on Devendra Fadnavis : तुम्ही आम्हाला धमक्या देता. ईडी, सीबीआय आहेत म्हणून यांची जीभ तुरुतुरु चालते आहे. 'सीबीआय आणि ईडी म्हणजे सरकारचे बॉडीगार्ड झाले आहेत, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला  जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

Updated: Apr 5, 2023, 10:25 AM IST
'ED, CBI ला बाजुला ठेवा, मग काडतूस दाखवतो', संजय राऊत यांचा फडणवीसांसह शिंदेवर हल्लाबोल title=

Sanjay Raut on Devendra Fadnavis and Eknath Shinde : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'ईडी, सीबीआयला बाजुला ठेवा, मग काडतूस दाखवतो', असा थेट इशारा राऊत यांनी फडणवीस यांना दिला आहे. फडणवीस गृहमंत्री झाल्यानं महाराष्ट्राची अडचण झाली आहे. ईडी, सीबीआय आहेत म्हणून यांची जीभ तुरुतुरु चालते आहे. 'सीबीआय आणि ईडी म्हणजे सरकारचे बॉडीगार्ड झाले आहेत, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.

आम्ही कुठं बोललो झुका म्हणून. हे सगळे झुके आहेत. डॉक्टर मिंधे यांच्या टोळीने आपच्या एका महिलेवर हल्ला केला. त्यांच्या भेटीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेले होते. त्या महिलेवर हल्ला झाला. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नपुसंक म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सौम्य शब्दात टीका केली आहे. फडतूस म्हटले. मात्र, गृहमंत्री झाल्याची आम्हाला नाही तर महाराष्ट्राला अडचण आहे. भिजलेली काडतूस आहेत. इडी सीबीआय बाजूला ठेवून या, मग बघा. तुम्ही गृहमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात तीन लोकांनी आत्महत्या केल्या. तुम्ही काय करत आहात, असा थेट सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

तुम्ही आम्हाला धमक्या देता. इडी आणि सीबीआय तुमचे बॉडीगार्ड आहेत. कोण बावनकुळे तुमचं तिकीट का कापलं? तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला तिकिट का दिलं नाही. तुम्ही वीज खात्यात काय केलं होतं. ते दिल्लीपर्यंत आलं होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये. तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत, असा इशारा राऊत यांनी दिला. ठाण्यात परवानगी देण्यात आलेली नाही. त्यांच्या हातात काही नाही. त्यांना अयोद्धा आम्ही दाखवली. हे बेळगावला पण गेले नव्हते. मुख्यमंत्री असल्याने अयोद्धेचा गल्ल्या माहित झाल्या असतील, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.

छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, कर्मवीर भावराव पाटलांवरती कधी गौरव यात्रा का काढली नाही या काडतूसांनी? तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत. चंद्रकांत पाटील महान गृहस्थ आहेत. गौतम अदानीवर बोलू दिलं जात नाही, डीग्रीवर बोलू दिलं जात नाही. चीन तिकडे घुसखोरी करत आहेत. त्याच्यावर बोलत नाहीत.  ते काडतूसे तिकडे पण घाला, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. 

संजय राऊतांचा हल्लाबोल

- संजय राऊत यांची फडणवीसांसह शिंदेवर जोरदार टीका
-  'सध्याच्या सरकारमध्ये सगळेच मिस्टर झुके'
-  'सरकार बिनकामाचं म्हणून फडतूस शब्द वापरला'
-  'ईडी, सीबीआयला बाजुला ठेवा, मग काडतूस दाखवतो'
-  'फडणवीस गृहमंत्री झाल्यानं महाराष्ट्राची अडचण'
-  'ईडी, सीबीआय आहेत म्हणून जीभ तुरुतुरु चालते'
-  'सीबीआय आणि ईडी म्हणजे सरकारचे बॉडीगार्ड'
-  शिंदेंसोबत काम करावं लागणं म्हणजे झुकणंच
-  तुम्ही झुकलेलाच आहात, फडणवीसांना प्रत्युत्तर