दिल्लीतील अहमदशाह अब्दालीने महाराष्ट्रातील नेत्याला सुपारी दिलीय; ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊत यांचा संताप

महाराष्टात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका मोठ्या प्रमाणावर करतायेत. या टीकांचे प्रतिसादही आता उमटून येत आहेत. ठाण्यातील राड्यानंतर  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा ठाकरे विरूद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत..

वनिता कांबळे | Updated: Aug 11, 2024, 08:42 PM IST
दिल्लीतील अहमदशाह अब्दालीने महाराष्ट्रातील नेत्याला सुपारी दिलीय; ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊत यांचा संताप title=

Sanjay Raut On Raj thackeray : राज ठाकरेंनी इशारा काय दिला... मनसैनिकांनी थेट ठाकरेंच्या ताफ्यावर हल्लाबोल केला.. आक्रमक मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा घातला.. दिल्लीतल्या अहमदशहा अब्दालीच्या सुपारीवरुन काल ठाण्यात हल्ला झाला. काळोखाचा फायदा घेऊन हल्लेखोर वाचले.. मर्दाची औलाद असेल तर समोर या असं आव्हानच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिले. 

ठाण्यातील मनसेच्या राड्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया देताना शाहांसह शिंदे, राज ठाकरेंवर निशाणा साधलाय...दिल्लीतील अहमदशाह अब्दालीने महाराष्ट्रातील नेत्याला सुपारी दिलीय...अब्दालीच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती. त्यांनी डरपोकांप्रमाणे काळोखात लपून नारळ आणि शेण फेकलं...आमच्यासमोर आले असते तर त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे, ते दाखवून दिलं असतं, अशा शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय...

ठाकरेंच्या ताफ्यावर मनसैनिकांचा आक्रमक हल्ला

ठाकरेंचा भगवा सप्ताह मेळावा ठाण्याच्या गडकरी रंगातयनमध्ये आयोजीत करण्यात आला होता. मात्र ठाण्याच्या दिशेने निघालेल्या ठाकरेंच्या ताफ्यावर मनसैनिकांनी आक्रमकपणे हल्ला चढवला. विशेष म्हणजे या राड्यात महिला मनसैनिकांचा मोठा समावेश होता. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मनसे कार्यकर्त्यांशी राज यांनी संवाद साधत कार्यकर्त्यांचं कौतुक केलंय... मात्र या राड्यानंतर मनसे आणि शिवसेना नेत्यांनी एकमेकांना आव्हान देणं सुरू केलंय. 
नशीब  ते आमच्यासमोर आले नाहीत. अन्यथा त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे, ते दाखवून दिले असतं अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केलाय

ठाकरे गटाने राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपा-या फेकत राडा घातला होता..त्याचीच रिअॅक्शन नंतर ठाण्यात दिसली..  विधानसभा निवडणुकीआधी ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष रस्त्यावर आलाय... दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.. जशास तसं उत्तर दिलं जातंय... त्यात दोन्ही गटाचे नेते शाब्दिक हल्ला करत हा वाद आणखीन पेटवताना दिसतायत.