महाराष्ट्रात राजकीय वादळ, दिल्लीत खळबळ! बीड प्रकरणी धनंजय मुंडे राजीनामा देणार?

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. दिल्लीत बैठकांचा जोर वाढला आहे. अजित पवार ठरवतील माझ्या विषयी काय करायचे. पक्ष आणि अजितदादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडली. 

वनिता कांबळे | Updated: Jan 29, 2025, 03:27 PM IST
महाराष्ट्रात राजकीय वादळ, दिल्लीत खळबळ! बीड प्रकरणी धनंजय मुंडे राजीनामा देणार? title=

Santosh Deshmukh Murder Case :  बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय वादळ निर्माण झाले आहे.   बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी होतेय. या पार्श्वभूमिवर धनंजय मुंडे यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठीही झाल्यात.तसंच आज धनंजय मुंडे दिल्लीतही भेटीगाठी घेतायत अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. 

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह भाजप आमदार सुरेश धस यांनी लावून धरली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे तातडीनं दिल्लीला गेले आहेत. देवेंद्र फडणवीसही तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.. तर मुंडेंच्या दिल्ली दौ-यावरुन खासदार संजय राऊतांनीही टोला लगावला आहे. 

दिल्ली दौ-यादरम्यान पत्रकारांनी धनंजय मुंडेंना गाठून राजीनाम्याबाबत विचारणा केली असता मला टार्गेट केलं जातंय. जर मी दोषी असेन तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सांगतील आणि मी राजीनामा देईन असं वक्तव्य मुंडेंनी केले आहे.  21व्या शतकात काही लपून राहात नाही. माझ्या आधी माझे विचार तुम्हाला कळतात असा टोलाही त्यांनी लगावला. 

अजित पवार ठरवतील माझ्या विषयी काय करायचे. पक्ष आणि अजितदादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडली. वैयक्तिक काहीजण राग ठेवत आरोप करत असल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी बैठकीत केला, उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे. 

दरम्यान,  वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविषयी  विचारलेल्या प्रश्नावर  पंकजा मुंडेंचा उत्तर देणं टाळलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काहीही म्हणण नाही.  मी फक्त ऐकुन घेते असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडेंनी मंत्रालयात जाऊन  अजित पवारांची भेट घेतली. -राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंडे पवार भेटीला महत्व आले आहे. 

आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांकडून अपेक्षा ठेवू नका.  धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार नाही असं क्षीरसागर म्हणाले. वाल्मिक कराड 6 महिन्यांनी निर्दोष सुटेल. सर्व एकाच माळेचे मणी. महादेव मुंडेचे मारेकरी सुद्धा अटक केले जाणार नाहीत. न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासन पुर्णपणे बरबटलेली आहे.सामान्य माणसाला न्याय कधीच मिळणार नाही.सत्ता आणि पैशासमोर सामान्यांना झुकावच लागतं. मोर्चे बिर्चे काढुन काही उपयोग नाही.असच जर सुरु राहिल तर परिस्थितीला कंटाळून इराक सीरीया सारखी परिस्थिती झाली तर नवल नको वाटायला.या प्रकरणाचा आदर्श घेऊन उद्या राज्यात जर जाति जातित गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या तर राज्य गृह युद्धाच्या दिशेनं जाऊ शकत असंही संदीप क्षीरसागर म्हणाले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x