कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के

साताऱ्यातील कोयना धरण परिसरात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 10, 2017, 07:25 AM IST
कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के title=

सातारा : साताऱ्यातील कोयना धरण परिसरात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

पहाटे ५ वाजून १९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. सातारा, सांगली जिल्ह्यातील काही परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या परिसरात असल्याचे सांगितले जाते. या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले.