Shri Vitthal Rukmini Mandir : विठूरायाच्या दानपेटीत दोन कोटींच्या सुवर्ण दागिन्यांचं गुप्त दान

जालन्यातील एका भाविकानं हे गुप्त दान केले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी या भक्ताने ही भेट दिली. यात दोन सोन्याचे मुकुट, सोन्याच्या बांगड्या आणि सोन्या चांदीचे रुखवत असे दागिने विठूरायाच्या चरणी अर्पण केले आहेत.

Updated: Jan 27, 2023, 12:12 AM IST
Shri Vitthal Rukmini Mandir : विठूरायाच्या दानपेटीत दोन कोटींच्या सुवर्ण दागिन्यांचं गुप्त दान

Shri Vitthal Rukmini Mandir, सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : विठूरायाच्या (Shri Vitthal Rukmini Mandir)दानपेटीत आजवरचं सर्वात मोठं दान जमा झाले आहे.  तब्बल दोन कोटींच्या सुवर्ण दागिन्यांचं गुप्त दान विठूरायाच्या चरणी अर्पण करण्यात आले आहे (Secret donation of gold ornaments worth two crores). भाविकाकडून रेशमी वस्त्राचा पोशाखही विठू माऊलीसाठी देण्यात आला आहे .

विठूरायाच्या दानपेटीत तब्बल दोन कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर पडली आहे. जालन्यातील एका भाविकानं हे गुप्त दान केले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी या भक्ताने ही भेट दिली. यात दोन सोन्याचे मुकुट, सोन्याच्या बांगड्या आणि सोन्या चांदीचे रुखवत असे दागिने विठूरायाच्या चरणी अर्पण केले आहेत. तसंच विठुरायासाठी रेशमी वस्त्राचा पोशाख देखील भेट दिला आहे. हे सर्व दागिने मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

वसंतपंचमीच्या मुहुर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा

पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज विवाह सोहळा पार पडला. माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंतपंचमीच्या मुहुर्तावर विठ्ठल रुक्मिणीचं लग्न लावण्यात आलं. मत्स्य मंडप फुलांनी सजवण्यात आला होता. विठ्ठल मंदिराला पुण्याचे भाविक भारत भुजबळ यांनी 7 टन फुलांनी साजवले. स्वयंवर ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणं माघ शुक्ल पंचमी ही कृष्ण रूक्मिणी विवाहाची तिथी आहे. त्यामुळंच वसंतपंचमीला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सजवण्यात आल्या. या विवाह सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली.. मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या सुमधूर आवाजात उपस्थितानी अक्षता टाकल्या. 

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात  तिरंगा रंगाची सजावट

भारतीय स्वातंत्र्याचा 74 प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ही तिरंगा रंगाची सजावट करण्यात आली. शेकडो टन फुले वापरून आकर्षक सजावट करण्यात आली. पुण्यातील श्री विठ्ठल भक्त सचिन अण्णा चव्हाण यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुंदर अशी सजावट केली.  यामुळे संपूर्ण विठ्ठलाने रुक्मिणी मंदिर हे तिरंगा मध्ये झाल्याचे  दृश्य पाहायला मिळाले.