सट्टेबाजीच्या दलदलीत बॉलीवूडची आणखी ७ नावं

अभिनेता अरबाज खान आणि सट्टेबाज सोनू जालान यांच्या ५ तासांच्या चौकशी दरम्यान बॉलीवूडमधील अजून ७ नावं सट्टेबाजीमध्ये अडकल्याचं समोर आलं आहे.

Updated: Jun 3, 2018, 08:44 PM IST

ठाणे : अभिनेता अरबाज खान आणि सट्टेबाज सोनू जालान यांच्या ५ तासांच्या चौकशी दरम्यान बॉलीवूडमधील अजून ७ नावं सट्टेबाजीमध्ये अडकल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे सोनूला एका बड्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याचं समोर येतंय. सट्टेबाजीच्या धंद्यात हा माजी पोलीस अधिकारीच सोनूला मदत करत असल्याचं उघड झालंय. तसंच दोन बारबालांच्या मदतीने सोनू फ्लॅट खरेदीत पैसे गुंतवत असल्याचंही उघड झालंय. बारबालांच्या नावे त्याने अडीच-अडीच कोटींचे फ्लॅट घेतल्याचं उघड झालंय.

सोनू जालान भेटलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ शूट करुन त्याला ब्लॅकमेल करत असे. अरबाजचा फोनही रेकॉर्ड करुन तो अरबाजला ब्लॅकमेलला करत होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. याप्रकरणात फिल्म निर्माता पराग संघवी हा सोनाचा सट्टेाबाजीमध्ये पार्टनर असल्याचं समोर आलं आहे. सोनू नामांकित व्यक्तींना सट्टेबाजीच्या जाळ्यात ओढून त्यांचा आपला धंदा वाढवण्यासाठी वापर करत असे. अरबाजचादेखील त्यानं आपला धंदा वाढवण्यासाठी उपयोग केला आणि काही अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शकांना त्यांनं जाळ्यात ओढलं.

सोनू जालानकडे बाराशेहून अधिकजण सट्टा लावत असत. तर सोनूच्या बॉसकडे सोनू जालानसारखे अजून १०० जण सट्टा लावण्याच्या प्रकरणात काम करत होते.