रत्नागिरी : एसटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊ, धनगर समाजाला आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं अशी अनेक आश्वासनं दिली मात्र त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेली नाहीत.. त्यामुळे 'मुख्यमंत्र्यांचं बोलणं, वागणं हे लबाडाच्या घरचं आवतण' असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. रविवारी संध्याकाळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५५ व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवताना त्यांनी लबाडाच्या घरचं आवतण कसं असतं याचं उदाहरणही दिलं, त्यामुळे उपस्थितांत एकच हशा पिकला.
मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवताना शरद पवार नेमकं काय म्हणाले ते तुम्हीच व्हिडिओतून पाहा...