शिर्डीतून दहा महिन्यात ८८ व्यक्ती बेपत्ता

 शिर्डीत 2018 मध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधुन 88 भाविक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती 

Updated: Dec 15, 2019, 05:56 PM IST
शिर्डीतून दहा महिन्यात ८८ व्यक्ती बेपत्ता title=

शिर्डी : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदीराला रोज हजारो भक्त भेट देतात. प्रत्येक गुरुवार, सणाला, वर्षाच्या सुरुवातीस-शेवटी इथे लाखोंची गर्दी जमते. साईंवरील श्रद्धेपोटी हे भाविक साई संस्थानाला भरभरून दान देखील देतात. दरवर्षी इथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान आलेल्या भाविकांमधून बेपत्ता होणाऱ्यांचे वास्तव देखील समोर आले आहे. 

मोठ्या शिर्डीत 2018 मध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधुन 88 भाविक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. इंदूर येथील साईभक्त मनोजकुमार सोनी यांनी मिळविलेल्या माहितीच्या आधिकारातून हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 

ऑगस्ट 2017 मध्ये मनोज सोनी पत्नी आणि मुलांसह साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. साई प्रसादलयातून भोजन केल्यानंतर त्यांची पत्नी तिथुन हरवली होती. त्यानंतर १० महिन्यात 88 व्यक्ती शिर्डीतून गायब झाल्याची नोंद शिर्डी पोलीस ठाण्यात आहे. 

या संदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. हरवलेली व्यक्ती सापडली की नाही याची माहिती नातेवाईक कळवत नाहीत. तसेच बेपत्ता लोकांचा मानवी तस्करीसाठी वापर झाल्याची तक्रार  आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

शिर्डीमध्ये नाताळच्या सुट्ट्यांआधीच भाविकांनी प्रचंड गर्दी केलीय.  काल शनिवारी दिवसभरात पन्नास हजार भाविकांनी दर्शन घेतलंय. रविवारी दुपारपर्यंत मोफत दर्शन पासद्वारे 35 हजार भाविकांनी दर्शन घेतलय.

साई संस्थानच्या जनसंपर्क विभागा मार्फत दुपारी साडे अकरा वाजे पर्यंत तब्बल 10 हजार भाविकांनी पैसे देवुन दर्शन पासेस घेतलेत त्यातुन तब्बल 20 लाख 19 हजार रुपयांची डोनेशन रक्कम मिळालीय.  आज दुपारपर्यंत तब्बल 17 लाख 73 हजार रुपयांच रोख आणि क्रेडीट डेबीट कार्ड द्वारे देणगी जमा झालीय.