Maharashtra Politics: अशोक चव्हाण, नाना पटोले काँग्रेसचे सर्व नेते भाजपसोबत... शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics:  संजय शिरसाट आणि वाद भरमसाठ अशी सध्या अवस्था आहे.. खास सूत्रांच्या हवाल्यानं त्यांनी हे एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट केले आहेत. 

Updated: Apr 3, 2023, 11:16 PM IST
Maharashtra Politics: अशोक चव्हाण, नाना पटोले काँग्रेसचे सर्व नेते भाजपसोबत... शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा title=

विशाल करोळे,झी मीडिया, छत्रपती संभाजी नगर :  काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे लोकसभा निवडणुकीआधी भाजपात जातील असा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) यांनी केला आहे. नाना पटोले (Nana Patole) काल सभेला आले नव्हते. त्यांना फार डिवचू नका, ते कुठेही जावू शकतात. तसंच 15 दिवसात ठाकरे गटांतील अनेक आमदार शिवसेनेत येतील असाही खळबळजनक दावा शिरसाटांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे (Maharashtra Politics).

शिवसेनेचे संजय शिरसाठ यांनी लवकरच काँग्रेसचे नेते अशोच चव्हाण भाजप मध्ये जाणार आसा दावा केला आहे. आता संजय शिरसाठांच्या या दाव्याला किती गांभिर्यानं घ्यायचं हा वेगळा प्रश्न आहे.  उद्धव गटाचे सर्व आमदार, खासदार नगरसेवक शिंदे गटात येणार. नाना पटोलेला डिवचू नका, ते काँग्रेसमध्ये थांबणार नाहीत असे दावे  संजय शिरसाट यांनी केले आहेत. अशोच चव्हाण कॉँग्रेसमध्ये खूश नाहीत. त्यामुळंच महाविकास आघाडीच्या सभेतही त्यांनी फक्त भाषण रेटून नेले असं त्यांच म्हणणं आहे. 

बाळासाहेब थोरातही काँग्रेस मध्ये खुश नाहीत असा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला आहे. मात्र, तिथं बाळासाहेबांचे कट्टर वैरी विखे पाटील असल्याचं ते भाजपात येत नसल्याचं शिरसाठांचे म्हणणे आहे. तर, नाना पटोले प्रचंड अहंकारी आहेत त्यांना डिवचले तर ते कुठेही जावू शकतात असाही शिरसाठांचा दावा आहे. येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे सोंबत असलेले सगळे, आमदार, खासदार, नगरसेवक माजी नगरसेवक हे सुद्धा एकनाथ शिंदे सोबत येतील असंही शिरसाठ यांच म्हणणं आहे.
धनुष्यबान चिन्ह आणि शिवसेना नाव आम्हालाच मिळणार

पहाटेचा शपथविधी बाबत संजय राऊतांना पुर्ण माहिती होती, ते घडवून आणण्यात संजय राऊत यांचाच मोठा वाटा होता. ही शरद पवार आणि संजय राऊत यांची संयुक्त खेळी होती. निवडणूक आयोगाचा निकाल आल्यावर शिवसेना रिकामी होईल आणि सगळे नेते मंडळी आमच्याकडे येतील. संजय राऊत हे शिवसेनेचे नाही तर पवारांचे प्रवक्ते आहेत, ज्यादिवशी शिवसेना पुर्ण संपेल त्यादिवशी संजय राऊत पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील.  उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या नावाचा व्यापर करताय, तो थांबला नाही तर लोक जोड्य़ाने मारतील अशेही शिससाठ म्हणाले आहेत.