विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे करणाऱ्या संस्थापकाला अटक

तालुक्यातील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 28, 2018, 11:38 PM IST
विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे करणाऱ्या संस्थापकाला अटक  title=

जुन्नर : तालुक्यातील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 

शाळेतील विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून शिक्षकांनी विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संपातजनक प्रकार उघडकीस आला आहे.  येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडला हा प्रकार.  शाळेचा संस्थापक सचिन घोगरेसह दोन शिक्षकांवर पालकांच्या फिर्यादीवरून जुन्नर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत जव्हार प्रकल्पातील २५० विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम शिकतात. स्कूलमधील आदिवासी विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून त्यांच्याबरोबर छेडछाड करून, विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करत शिक्षकांनी स्वतःच्या पेशाला काळिमा फासला आहे. त्यामुळे आदिवासी अस्मिता संघटना पालघर यांनी पुढाकार घेऊन आदिवासी विद्यार्थिनींना न्याय मिळण्यासाठी पालकांना हाताशी घेऊन त्या संचालकासह दोन शिक्षकांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी त्या आरोपींना अटकही केली आहे. त्यामुळे जव्हार प्रकल्पातील विद्यार्थी -पालकांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुलांसाठी मोफत खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांची निवड करून आदिवासी विकास विभागाकडून निवड केलेल्या इंग्रजी नामांकित शाळांत ही मुले पाठवली जात आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संपूर्ण फी आदिवासी विकास प्रकल्पातून भरली जाते. मात्र जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींवर झालेला हा प्रकार घृणास्पद आहे. त्यामुळे जव्हार तालुक्यातील पालकांचीही काळजी वाढली आहे. ज्या पालकांची मुले येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. त्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदिवासी विकास प्रकल्पातील महिनाभरापूर्वी पाचगणी येथिल इंग्लिश मीडियम शाळांत डहाणू प्रकल्पामधील एका विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. आणि अनेक मुद्दे समोर आले होते