म्हाडा पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती, असा कोडवर्डचा वापर

MHADA exam paper leak : 'म्हाडा' पेपर मिळवण्यासाठी कोडवर्डचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. 

Updated: Dec 14, 2021, 09:25 AM IST
म्हाडा पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती, असा कोडवर्डचा वापर title=
संग्रहित छाया

मुंबई :  MHADA exam paper leak : 'म्हाडा' पेपर मिळवण्यासाठी कोडवर्डचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपींच्या चौकशीत कोडवर्डची माहिती समोर आली आहे. 'झी 24 तास'च्या हाती कोडवर्ड लागले आहेत. याबाबत सायबर पोलिसांकडून फोन करणाऱ्यांची चौकशी होणार आहे. (Shocking information in MHADA exam paper leak, use of codewords)

म्हाडा पेपरफुटीप्रकरणाचा तपास जोरात सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सायबर सेलची पथकं वेगवेगळ्या शहरात दाखल झाली आहेत. या तपासादरम्यान पथकाला एक धक्कादायक माहिती समोर आली. म्हाडाचे पेपर मिळवण्यासाठी कोडवर्डचा वापर झाल्याची माहिती सूत्रांच्या आधारे समोर येत आहे. 
आरोपींना फोनवरून कोडवर्डच्या माध्यमातून म्हाडाचे पेपर मागण्यात आलेत,सूत्रांनी अशी माहिती दिलीय. त्यामुळे आता आरोपींना कोणीकोणी फोन केला त्यांची माहिती काढून त्यांची चौकशी सायबर सेलतर्फे करण्य़ात येणार आहे. 

दरम्यान, म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्याने काल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविप कार्यकर्त्यानी निदर्शने केली. त्यात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्याठिकाणी आले. त्यामुळे आणखी तणाव निर्माण झाला. 

पोलिसांनी अभाविपच्या आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान अभाविपच्या आंदोलकांना जशास तसं उत्तर दिल्याची प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली आहे. थेट घरावर आंदोलन करण्याऐवजी अभाविपने चर्चेला यायला हवं होते, असेही ते म्हणाले.