सापाने ९ अंडी तोंडावाटे काढली बाहेर

सापाने आधी दोन कोंबड्यांवर ताव मारत त्यानं कोंबडीची ९ अंडी गिळली. 

Updated: Jul 4, 2018, 10:48 PM IST
सापाने ९ अंडी तोंडावाटे काढली बाहेर

चंद्रपूर : आता एक वेगळीच घटना. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात एका नागाने कोंबडीची ९ अंडी फस्त केली.  मरेगावातल्या शामराव चौधरी यांच्या  गोठ्यात हा नाग शिरला. आधी दोन कोंबड्यांवर ताव मारत त्यानं कोंबडीची ९ अंडी गिळली. या नागाला पाहिल्यावर सर्पमित्र उमेश झिरे यांना बोलावण्यात आले. उमेश झिरे यांनी प्रयत्न करुन सापानं गिळलेली ९ अंडी बाहेर काढली. हा साप विषारी साप होता. आता त्याला पकडण्यात आल्यानं मरेगाव वासीयांची सुटका झालीय.