सोलापूर पालिकेच्या राजकारणात पक्षांतर्गत गटबाजीचा शिरकाव

सोलापूरच्या महापालिकेच्या राजकारणाला पक्षांतर्गत गटबाजी आणि गुंडाच्या टोळ्यांचा शिरकाव यांनी घेरले कि काय असा प्रश्न निर्माण झालाय.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 5, 2018, 09:47 AM IST
सोलापूर पालिकेच्या राजकारणात पक्षांतर्गत गटबाजीचा शिरकाव title=

सोलापूर : सोलापूरच्या महापालिकेच्या राजकारणाला पक्षांतर्गत गटबाजी आणि गुंडाच्या टोळ्यांचा शिरकाव यांनी घेरले कि काय असा प्रश्न निर्माण झालाय.

अर्ज पळविले

सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत झालेला गोंधळ व अर्ज पळविण्याच्या प्रकारामुळे शनिवारी होणारी निवडणूक प्रक्रिया रद्द केली. नंतर विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. 

नवीन इतिहास झालाय

यामुळे आता स्थायी सभापतीपदासाठी पुन्हा प्रक्रिया करण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा नवीन इतिहास झालाय अशी चर्चा नागरीकातून होतेय.