माथेफिरू मुलाकडून जन्मदात्या बापाची दगडाने ठेचून हत्या

धम्मदीप आणि त्याच्या वडिलांमध्ये सतत भांडणे होत असत. 

Updated: Sep 22, 2020, 12:13 PM IST
माथेफिरू मुलाकडून जन्मदात्या बापाची दगडाने ठेचून हत्या title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: क्षुल्कक कारणावरून पोटच्या माथेफिरू मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील परसोडी या गावात घडली आहे. रामकृष्ण काळे (वय ६३) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी मुलगा धम्मदीप काळेला (वय ३३) अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. धम्मदीप आणि त्याच्या वडिलांमध्ये सतत भांडणे होत असत. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये असाच वाद सुरु होता. त्यावेळी धम्मदीपने वडिलांच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे त्यांची हत्या केली.