Crime News : सर्वांसमोर बायकोच्या... अशी सासू कोणत्याच जावयाला मिळू नये; भयानक अपमान

सासूने ओळखीच्या लोकांसमोर पोलीस चौकी परिसरात पत्नीच्या पाया पडण्याचा तगादा लावला होता. चार चौघात  अपमानित झालेल्या जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांत सासू व पत्नीच्या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Updated: Jan 15, 2023, 10:06 PM IST
Crime News : सर्वांसमोर बायकोच्या...  अशी सासू कोणत्याच जावयाला मिळू नये; भयानक अपमान title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक  : सासूकडून झालेला अपमान सहन न झाल्याने जावयाने टोकाचे पाऊल उचलले आहे. सासूने अपमान केल्यामुळे जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नाशिकमध्ये (Nashik News) हा धक्कादायक  प्रकार  घडला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू आणि पत्नीच्या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Crime News). 

सासूने ओळखीच्या लोकांसमोर पोलीस चौकी परिसरात पत्नीच्या पाया पडण्याचा तगादा लावला होता. चार चौघात  अपमानित झालेल्या जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांत सासू व पत्नीच्या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नितीन चटोले असे मृत जावयाचे नाव आहे. नितीन हा आपली पत्नी आणि मुलांसोबत देवळाली गाव वडारवाडी येथे राहत होता. वडनेर गेट परिसरात राहणाऱ्या विमल बीडलान यांची मुलगी नेहा हिच्याशी नितीन याचा विवाह झाला होता. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून नितीन आणि नेहा यांच्यात भांडण झाल्याने नेहा ही आपल्या माहेरी निघून गेली होती. पत्नी माहेरी गेल्यामुळे नितीन हा नैराश्यात होता. त्यांनतर गुरुवारी नितीन आणि त्याची पत्नी यांच्यात सासू विमल हिने हस्तक्षेप केला. 

या कारणावरून तिघांमध्ये जोरदार भांडण झाले.  हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचले होते. नितीन विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर देवळाली गाव येथील सुंदर नगर पोलीस चौकी येथे सासू विमल बिडलान हिच्याकडून नितीन याला सर्वांसमोर त्याची पत्नी नेहा हिच्या पाया पडण्यास भाग पाडले होते.

सासूकडून झालेला अपघात नितीनला सहन झाला नाही. सर्वांसमोर अपमानित झाल्याच्या नैराश्यातून नितीन याने घरी जाऊन आत्महत्या करत आपले जीवन संपवले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मयत नितीनची सासू विमल बीडलान, मेहुणे विकी आणि राहुल यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.