ठाणे : मुंब्रा भागात एसआरपीएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. घरातच राहा, असे अनेक वेळा सांगूनही इथले लोक ऐकत नव्हते. त्यामुळे एसआरपीएफला पाचारण करावे लागले आहे. तर रस्त्यावर फिरण्यासाठी काहींनी शक्कल लढवत मेडिकलशी संबंधित बोगस ओळखपत्रही तयार केली आहेत. पोलिसांनी दोघांकडून अशी बोगस आयकार्ड जप्त केली असून याबाबत कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
BreakingNews । ठाण्यातील मुंब्रा भागात एसआरपीएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. घरातच राहा, असे अनेक वेळा सांगूनही इथले लोक ऐकत नव्हते. त्यामुळे एसआरपीएफला पाचारण करावे लागले आहे.#Coronavirus #Corona @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks @ShivSena@OfficeofUT @ashish_jadhao pic.twitter.com/qZJzw9pa1j
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 31, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठाण्यातील मुंब्रा येथे लावण्यात आलेला आहे. परंतु लोक काही केल्या पोलिसांचे ऐकत नाही. अजूनही मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर येत आहेत. यासाठीमुब्रा भागात एसआरपीएफची टीम तैनात करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या चार तुकड्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत, तरी देखील केवळ औषध किंवा हॉस्पिटलचे कारण सांगून नागरिकरस्त्यावर आहेत. त्यांना पोलिसांनी उठाबश्या तर काढायला तर लावल्याच पण कवायतीचे देखील प्रकार करून घेउन त्यांना रस्त्यावरच शिक्षा देण्यात आली.
दरम्यान, कोणत्यातरी मेडिकल विभागाशी निगडत आम्ही आहोत आणि हे आम्ह्चे आयकार्ड आहे, असे बोगस आयकार्ड मुब्रा भागातील काही तरुण पोलिसांना दाखावत आहेत. फक्त बाहेर फिरता यावे म्हणून मुब्रा भागातील काही तरुणांनाही असे बोगस आकार्ड बनवलेत आणि आता अश्या लोकांवर ठाणे पोलिसांची करडी नजर असणार आहे
मुब्रा भागात पोलिसांच्या नाकाबंदीत अनेक लोकांना अडवल्यावर ,त्यांच्या गाडीवर कोणत्यातरी मेडिकल विभागाचे पत्र लावले असते आणि नंतर हीच तरुण आपल्या किशातील आयकार्ड ही दाखवतात असेच 'आमार करोना रिलीफ' असे आय कार्ड दाखवणाऱ्या दोन तरुणांची आयकार्ड पोलिसांनी जप्त केली आहेत. फक्त बाहेर फिरण्यासाठी व आपली काही काम करण्यासाठी हे तरुण अस्से बोगस आयकार्ड बनवत आहे, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता पोलीस अश्या लोकांवर कडक कारवाई करणार आहेत. अश्या लोकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.