ST Strike : एसटी संप मिटणार?, सकारात्मक चर्चेनंतर सरकारकडून उद्या निवेदन

ST Strike News :एसटी संपाबाबत (ST Strike) आताची सर्वात मोठी बातमी. एसटी कर्मचारी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी संपाबाबत विधान भवनात महत्त्वाची बैठक झाली. 

Updated: Mar 9, 2022, 06:51 PM IST
ST Strike : एसटी संप मिटणार?, सकारात्मक चर्चेनंतर सरकारकडून उद्या निवेदन title=

मुंबई : ST Strike News :एसटी संपाबाबत (ST Strike) आताची सर्वात मोठी बातमी. एसटी कर्मचारी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी संपाबाबत विधान भवनात महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात झाली. एसटी संपाबाबतची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या चार महिन्यांपासून सुरु आहे. या संपावर तोडगा निघत नव्हता. अखेर आज एसटी संपाबाबत विधानभवनात चांगली आणि सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. विधानपरिषद सभापती बैठकीतून निघालेल्या तोडग्याबाबत सभागृहात माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे हा संप मिटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परिवहन मंत्री अनिल परब विधानपरिषदेत निवेदन करणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान ते निवेदन करतील. या बैठकीत सर्वपक्षीय आमदारांची समितीचे आणि एसटी कामगार प्रतिनिधींचे एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटीचा प्रदीर्घ काळ सुरु असलेला संप मिटण्याची शक्यता आहे.