कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक वाढतच आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूची संख्या वाढत आहे. तसेच जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. कोल्हापूर (Kolhapur ) जिल्ह्यात उद्या दुपारपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. (Strict lockdown for 10 days from Wednesday in Kolhapur district in Maharashtra)
कोल्हापूरमधील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच अनेक ठिकाणी लोक कोविड नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना लगाम घालण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन लागू होत आहे. याची वेगळी नियमावली जारी केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे 10 दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा झाली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री यांच्या बैठकीत लॉकडाऊन निर्णय करण्यात आला. जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता उद्यापासून कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन लावताना सकाळी 7 ते 11 या वेळेत दुकाने उघडण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र, काही लोक बाजारात खुलेआम फिरत आहेत. तर काही दुकानदार दुकाने सुरुच ठेवत आहेत. त्यामुळे कोल्हापूर येथे कडक लॉकडाऊनचा विचार पुढे आला.
देशात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता देशांत लॉकडाऊन लावावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. देशात लॉकडाऊन लावायचा की नाही, हा केंद्राचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतल्यास त्यांचा निंर्णय सर्व राज्यांना पाळावाच लागतो. त्यामुळे राज्य देखील केंद्राचा आदेश पाळणार असून पंतप्रधान योग्य निंर्णय घेतील असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.