आदिवासींसाठी काम करणारे सुनील देशपांडे यांचे कोरोनाने निधन

पूर्ण बांबू प्रकल्प केंद्र लवादा मेळघाटचे संस्थापक सुनील गुणवंतराव देशपांडे (Sunil Deshpande) यांचे निधन झाले. त्यांच्यावर कोरोनाचे (Coronavirus) उपचार सुरु होते.  

Updated: May 20, 2021, 08:40 AM IST
आदिवासींसाठी काम करणारे सुनील देशपांडे यांचे कोरोनाने निधन title=

नागपूर : संपूर्ण बांबू प्रकल्प केंद्र लवादा मेळघाटचे संस्थापक सुनील गुणवंतराव देशपांडे (Sunil Deshpande) यांचे निधन झाले. त्यांच्यावर कोरोनाचे (Coronavirus) उपचार सुरु होते. नागपूरमधील किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या पश्चात आई, पत्नी डॉ. निरुपमा, कन्या मुग्धा असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या निधनाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. (Sunil Deshpande passes away at Nagpur)

सुनील देशपांडे यांनी नागपूर संपूर्ण बांबू केंद्र लवादा मेळघाटची स्थापना केली. या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी आपले समाजकार्ये सुरु ठेवले. ग्रामीण आणि आदिवासी बांधवांच्या विकासासाठी नेहमी पुढाकार घेतला. हे काम त्यांनी शेवटपर्यंत निभावले. त्याचे आयुष्य आदिवासींच्या कल्याणासाठी गेले. त्यांनी खऱ्या अर्थाने आपले आयुष्य मेळघाटातील आदिवाशींच्या बंधुच्या विकासाठी वेचले.

MSW केल्यानंतर आर्किटेक्ट विनू काळे यांच्या प्रेरणेने त्यांनी बांबू हे आपले कार्यक्षेत्र ठरवले होते. अखिल भारतीय कारागीर पंचायतचे ते राष्ट्रीय संघटक होते. सुरुवातीस त्यांनी नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट प्रकल्पातही काम केले होते.

त्यांच्या जानाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच आदिवासी बंधुसाठी झटणारा मोठा कार्यकर्ता हरपला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. समाजसेवेच व्रत घेतलेल्या सुनीलजी यांना विनम्र श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो. ऊँ शांती.