पुण्यात घिरट्या घालतयं संशयास्पद ड्रोन; पुणेकरांवर कोण आणि का ठेवतयं वॉच?

पुण्यात संशयास्पद ड्रोन फिरताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक चौकशी करत आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jun 24, 2024, 04:06 PM IST
पुण्यात घिरट्या घालतयं संशयास्पद ड्रोन; पुणेकरांवर कोण आणि का ठेवतयं वॉच? title=

Pune News : कोयता गँगची दहशत,  पोर्शे कार अपघात प्रकरण यानंतर  पुणे चर्चेत आले आहे ते ड्रग्ज प्रकरणामुळे. पुण्यात सर्रासपणे ड्रग्ज उपलब्ध करुन दिले जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात एक संशयास्पद ड्रोन घिरट्या घालत असल्याचे समोर आले आहे.   पुणेकरांवर कोण आणि का वॉच ठेवतयं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

पुण्यात संशयास्पद ड्रोन

पुण्यातील मुळशी मध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याचं समोर आले आहे. असाच एक ड्रोन आकाशात घिरट्या घालत असताना भरे गावातील एका ग्रामस्थाच्या घरावर पडल्याची घटना घडलीय. रात्रीच्या अंधारात उडवण्यात येणाऱ्या या ड्रोनमुळे परिसरात संशयाचं तसेच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हे ड्रोन चोरीच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी वापरले जात असल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. तर हे drone  मुलांच्या खेळण्यातील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुळशीमध्ये भोंगावणाऱ्या या संशयास्पद ड्रोनबाबत नेमका खुलासा होण्याची आवश्यकता आहे.

महिलेचे  अपहरण करून अमानुष मारहाण

पुण्यातील शिक्रापूरमध्ये तीन तरुण आणि एका महिलेचे दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने अपहरण करून या अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय...कोयता, लाठ्या काठ्यांनी मारहाण करत हात पाय बांधून उलटे लटकवल्याची धक्कादायक घटना समोर आलीय...व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राचा बिहार झालाय का अशी म्हणण्याची वेळ आलीय...अमाणुषपणे मारहाण करणाऱ्या आरोपींचा आता पुणे ग्रामीण पोलीस शोध घेतायत...मात्र, आता या गुन्हेगारांचा शोध घेऊन पोलीस कारवाई करणार का...? हे पाहणं आता महत्त्वाचा असणार आहे...