औरंगाबाद : वाढीव वीज बिलाविरोधात (Electricity bill) स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे. आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) औरंगाबादेत (Aurangabad)आंदोलन सुरू केले आहे. महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयाबाहेर शेतकाऱ्यांनी (farmer) ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
लोडशेडिंग बंद करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. औरंगाबादेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना दिवसा देखील वीज मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. वीजेच्या वेळेत बदल करा तसेच लोडशेडिंग बंद करा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने औरंगाबादेत आंदोलन सुरू केले आहे. महावितरणच्या कार्यालयाबाहेर शेतकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रात्रीतून शेतात जावे लागते म्हणून अनेक शेतकऱ्यांचे जीव गेले आहेत तरी सुद्धा राज्य सरकार शेतकऱ्यांना वीज मध्यरात्रीच देते, जोपर्यंत वीज दिवसा मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.