"महाराष्ट्रात राज ठाकरेंची सत्ता नाही हे राज्याचं दुर्दैव"

Raj Thackeray Birthday : राज ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांना त्यांना शुभेच्छा दिल्या. यात फक्त त्यांचे चाहते नाहीत तर अनेक सेलिब्रिटी आहेत. मराठमोळे कलाकार आणि बॉलिवूड अभिनेत्यानं देखील त्यांना खा शुभेच्छा दिल्या आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 15, 2023, 11:34 AM IST
"महाराष्ट्रात राज ठाकरेंची सत्ता नाही हे राज्याचं दुर्दैव" title=
(Photo Credit : Social Media)

Raj Thackeray Birthday : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्यांचे अनेक चाहते आणि कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत. पण हे भक्त इथेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात मराठमोळा अभिनेता तेजस्विनी पंडित आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख देखील आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

तेजस्विनी पंडितनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तेजस्विनीनं राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते गॅलरीत बसले असून हा फोटो शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी क्लिक करण्यात आले आहेत. हा फोटो शेअर करत तेजस्विनी, म्हणाली "आदरणीय राजसाहेब ठाकरे, 20 वर्ष झाली आपल्या परिचयाला ! पण संवाद कदाचित हल्लीच झाला तुमचं खुप कौतुक वाटतं मला... इतकं परिपूर्ण व्यक्तिमत्व... राजकारण, संगीत, कला, क्रीडा, इतिहास, कॉमन सेन्स आणि मुख्‍य म्‍हणजे सार्वभौम आणि वे अहेड ऑफ द टाइम व्हिजीन (way ahead of time Vision) असलेला एकमेव नेता!"

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे या विषयी सांगताना तेजस्विनी म्हणाली,"स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला, तो वाढवलात, वृधिंगत केलात... इतकी वर्ष पर्वतासारखे जगलात, अनेक संकटं आली पण कुटुंब प्रमुख बनून एवढी कुटुंब जपलीत, स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत, लाचारी पत्करली नाहीत... राजकारणात मैत्री आणली नाही, आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. सो कॉल्ड फास्ट लाइफ (So called fast life) मध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या आयुष्‍यात ठेहराव आणलात आणि आमच्‍या मनात अढळ स्‍थान निर्माण केलंत! हा नेव्हर गिव्हअप अॅटिट्यूड इतका ठासून कसा हो भरलाय तुमच्यात ? राजकारणातल्या एवढ्या अवघड आणि प्रतिकुल प्रवासात अनेकजण तलवारी टाकून देतात, काही ढाल धरून उभे राहतात पण तुम्ही बेदरकारपणे तुमची मतं मांडत गेलात आणि ते आजही चालूच आहे... कारण कर नाही त्याला डर कशाला !मुख्‍य म्‍हणजे तुमच्‍या जाणिवा अजूनही जिवंत आहेत ! तुमच्‍या वाढदिवसानिमित्त एवढं मात्र नक्की म्हणावसं वाटतं “राज ठाकरे यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे !”

हेही वाचा : बॉलिवूड सुपरस्टारची पत्नी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी आली, भावात घासाघीसही केली; पाहा Video

तेजस्विनी पुढे, म्हणाली "तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अश्या अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं ह्यसाठी मी स्‍वामींची आभारी आहे. देव तुम्हाला दीर्घ आयू देवो आणि वाढदिवसा व्यतिरिक्त शुभेच्छांचा आणि प्रेमाचा पाऊस सदैव तुमच्‍यावर बरसत राहो कोटी कोटी शुभेच्छा आणि प्रेम राजसाहेब."

Tejaswini Pandit and riteish deshmukh wished Raj Thackeray on his Birthday post went viral

तर अभिनेता रितेश देशमुखनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून त्याचा आणि राज ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत रितेश, म्हणाला "मराठी हृदयावर राज्य करणारे, एक उत्कृष्ठ वक्ते, महाराष्ट्राचे नेते व माझे मित्र श्री राज ठाकरेजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.