मावळ येथे भरधाव टेम्पोने 20 वारकऱ्यांना चिरडले

Maval accident : मावळ तालुक्यात भरधाव टेम्पोने वारकऱ्यांना चिरडले.  

Updated: Nov 27, 2021, 01:46 PM IST
मावळ येथे  भरधाव टेम्पोने 20 वारकऱ्यांना चिरडले

पुणे : Maval accident : मावळ तालुक्यात भरधाव टेम्पोने वारकऱ्यांना चिरडले. या दुर्घटनेत दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 20 वारकरी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Tempo crushed 20 Warakaris at Maval)

पायी दिंडीला टेम्पोची धडक

मावळ तालुक्यातील साते गावाजवळ आज सकाळी आळंदीकडे पायी जाणार्‍या पालखीमध्ये भरधाव वेगातील टेम्पो घुसला. या झालेल्या अपघातात 20 ते 22 वारकरी जखमी झाले असल्याची माहिती वडगावचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिली. तर यामध्ये दोन वारकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वडगाव मावळ पोलिसांनी दिली आहे. 

सर्व जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. खालापूर तालुक्यातील उंब्रे, कर्जत, खालापूर, खोपोली भागातील 200 वारकरी या पायी पालखीमध्ये सहभागी झाले होते. सकाळच्या सुमारास ही पालखी आळंदीकडे जात असताना हा भीषण अपघात झाला.