पुणे : TET Exam Scam : महाराष्ट्र परीक्षांच्या भरती घोटाळ्यात पुरता अडकून गेला आहे. म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा आणि सर्वात मोठा घोटाळा तो म्हणजे शिक्षक भरती घोटाळा. या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. (TET Exam Scam : 300 fake certificates seized in teacher recruitment scam)
शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी उमेदवारांना पोस्टानं पाठवलेली तीनशे बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 7 हजार 900 जणांना पात्र केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सविस्तर अहवाल तयार करुन सरकारला सादर केला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामुळे आता बोगस शिक्षकांची जेलची हवा पक्की झाली आहे.
बोगस 7,900 शिक्षकांची ( TET teachers) यादी पत्त्यांसह तयार करण्यात आली आहे. ही यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. आता पुणे पोलिसांकडून (Pune Cyber Police) लवकरच कारवाईचा बडगा उगरण्यात येणार आहे. टीईटी घोटाळा प्रकरणात खळबळजनक माहिती उघड झाली आहे. बोगस 7,900 शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार झाली आहे. अपात्र उमेदवारांविरुद्ध कारवाईसाठी पुणे सायबर पोलीस (Pune Cyber Crime Police) तयार आहेत. अपात्र उमेदवारांच्या मूळ गुणांमध्ये वाढ करुन पास केले गेले.
दरम्यान, आता आणखी एक घोटाळा पुढे आला आहे. पोलीस भरतीत मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस आले आहे. पोलीस भरतीत बनावट उमेदवारांचा शिरकाव झाला आहे. तब्बल 3 लाख रुपये मोजून परीक्षेला डमी उमेदवार बसवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे पोलीस भरतीत पास होण्यासाठी तब्बल 3 लाख रुपयेही मोजल्याचं समोर आले आहे. डमी उमेदवारांमागे 'औरंगाबाद' कनेक्शन असून, मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे.