ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागतासाठी कोकणातले समुद्रकिनारे गजबजले

ख्रिसमस सेलिब्रेशन आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणातले समुद्रकिनारे गजबजले आहेत.  

Updated: Dec 25, 2021, 03:49 PM IST
ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागतासाठी कोकणातले समुद्रकिनारे गजबजले title=
संग्रहित छाया

रत्नागिरी, रायगड : ख्रिसमस सेलिब्रेशन आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणातले समुद्रकिनारे गजबजले आहेत. तर उत्तर महाराष्ट्रातील शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. (Welcome - The beaches of Konkan are full of people for Christmas and New Year)

पर्यटक रायगडात दाखल 

मुंबईपासून जवळ असलेले रायगडचे किनारे पर्यटकांचं फेवरीट डेस्टिनेशन ठरले आहेत. त्यामुळे नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्याना पसंती दिली आहे. मोठ्या संख्येने पर्यटक इथं दाखल होत आहेत. त्यामुळे किनारे गजबजायला सुरुवात झाली आहे.  पर्यटकांच्या आगमनाने स्थानिक व्यावसायिक देखील खुश आहेत.  

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सहाजिकच कोकणाला देखील मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. पण यंदा मात्र काही वेगळं पाहायला मिळतं आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक तर काही ठिकाणी पर्यटकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे. 

कोकणातील एमटीडीसीचे सर्व रिसॉर्ट फुल झाले आहेत. पण रत्नागिरी, गणपतीपुळे या ठिकाणी मात्र पर्यटकांची संख्या तुलनेने कमी आहे. तर दापोली, गुहागर या भागात मात्र पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. एकंदरीत कोकणात यंदा संमिश्र प्रतिसाद आपणाला दिसून येत आहे.

शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी

दरम्यान, नाताळाच्या सुट्ट्यात साईदर्शनाबरोबरच सरत्या वर्षाला निरोप तसेच नवीन वर्षाच्या स्वागत साईच्या दर्शनाने करण्यासाठी आजपासून गर्दी होण्यास सुरवात  झाली आहे. शिर्डीत दिवसभरात ऑफलाईन आणि ऑनलाईन पासेस द्वारे केवळ 25 हजार भाविकांना दर्शन दिल जात आहे. आज शासन राज्यात नवीन नियमावली जाहीर करणार असल्याने त्यानंतर शिर्डीतही गर्दी दिसून येत आहे.