नाशिकमध्ये सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

गेल्या आठ पंधरा दिवसपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शहराजवळील डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील डोंगरावरून दुधी धबधबे वाहू लागले आहेत. धुक्याने ह्या सौंदर्यात आणखीनच भर पडली असून निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो आहे.

Updated: Jul 2, 2017, 04:56 PM IST
नाशिकमध्ये सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी title=

नाशिक : गेल्या आठ पंधरा दिवसपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शहराजवळील डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील डोंगरावरून दुधी धबधबे वाहू लागले आहेत. धुक्याने ह्या सौंदर्यात आणखीनच भर पडली असून निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो आहे.

नशिकच्या गंगापूर रोडवरील सोमेश्वरधबधबा ही प्रवाहीत झाला असून त्याचा आनंद लुटण्यासाठी महाविद्यालयीन तरुण, तरुणी, पर्यटकांनी गर्दी केली आहे. पावसाचे आल्हाददायक थेंब झेलत सोबतीला मक्याच्या कणसावर तव मारत सेल्फी काढत नाशिककर निसर्गाचा आनंद लुटत आहेत.