मिरवणूकीत 'नाच, नाच' असा वाकडंतिकडं नाचला, आणि मग अडवणाऱ्यालाच संपवला

नांदेड सिडको भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली.

Updated: Apr 15, 2022, 06:52 PM IST
मिरवणूकीत 'नाच, नाच' असा वाकडंतिकडं नाचला, आणि मग अडवणाऱ्यालाच संपवला title=

नांदेड : नांदेड सिडको भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली. बळीरामपूर गावातील किशोर ठाकूर हा या मिरवणुकीत वाकडंतिकडं नाचून इतरांना त्रास देत होता.

किशोरला वाकडंतिकडं नाचताना पाहून सचिन थोरात या युवकाने त्याला अडवलं. त्यानं किशोरला मिरवणुकी बाहेर जाण्यास सांगितलं. यातून त्या दोघात वाद झाला. यातूनच झालेल्या वादातून किशोरने सचिनवर चाकूने सपासप वार केले.

सचिनसोबत असलेल्या सुमेध वाघमारे हा यावेळी मध्ये आला. त्याच्यावरही किशोर याने चाकूने वार केले. या हल्यात सचिन थोरात याचा मृत्यू झाला तर सुमेध गंभीर जखमी झाला. हा प्रकार घडल्यानंतर घटनेचे काही व्हीडिओ उपस्थितांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले.

हत्येनंतर किशोर आपला मित्रासह दुचाकीवर बसून पळून जाताना दिसले. मिळालेल्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी किशोर ठाकूर आणि शेख आदील यांना अटक केली.