समृद्धी महामार्गाचा दुस-या टप्प्यातील मार्गावर पहिला अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

समृद्धी महामार्गावरच्या दुस-या टप्प्यातील शिर्डी-भरवीर मार्गावर पहिला अपघात झाला आहे. दोघांचा मृत्यू, दोन जण जखमी झाले आहेत.   

वनिता कांबळे | Updated: Jun 3, 2023, 10:26 PM IST
समृद्धी महामार्गाचा दुस-या टप्प्यातील मार्गावर पहिला अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी  title=

shirdi bharvir samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गाचा दुस-या टप्पा प्रवाशांसाठी खुला झाला आहे.  शिर्डी ते भरवीर असा 82 किलोमीटरचा हा दुसरा टप्पा आहे. या दुसऱ्या टप्यातील समृद्धी मार्गाचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.  दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर  पहिला अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. 

शुक्रवारी मध्यरात्री शिर्डीजवळ हा अपघात झाला आहे.  चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटल्याने हा अपघात झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील या महामार्गावर विशेष सुविधा तयार करून अपघात कमी होतील असा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र, तरीही येथे अपघात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

या भीषण अपघातात जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात धरमसिंग काळूसिंग गुसिंगे (वय 52 वर्षे, रा. ता.बदनापूर जि.जालना) राघवेंद्र भरतसिंग परदेशी ( वय 11 वर्षे रा.ता.बदनापूर जि.जालना) आणि राजेंद्र नरसिंगराव राजपूत (वय 48 वर्षे रा.ता.फुलंब्री जि. औरंगाबाद) यांचा मृत्यू झाला आहे. 

असा आहे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा

दुसरा टप्पा 82 किमी लांबीचा आहे. या मर्गावर  तीन टोल नाके आहेत.  या दुस-या टप्प्यात सिन्नरमधल्या गोंदे इंटरचेंज इथून नाशिक, अहमदनगर, पुणे आणि त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होत आहे. एमएसआरडीसीने बांधलेल्या  एकूण 701 किमीच्या या महामार्गाचा 520 किमीचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सुरू झाला होता. 

समृद्धी  महामार्गावर अपघात का होतात?

समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात ‘महामार्ग संमोहन’मुळे होत असल्याचा निष्कर्ष ‘व्हीएनआयटी’ विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून समोर आला होता. समृद्धीवर सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता वाढली आहे. अपघाताची कारणं शोधण्यासाठी नागपूरच्या ‘व्हीएनआयटी’ संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या ट्रान्सपोर्टेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर तीन महिने नागपूरहून १०० किलोमीटर परिसरात अभ्यास केला. त्यात समृद्धीवरील अपघातासाठी ‘महामार्ग संमोहन’ जबाबदार असल्याचे निरीक्षणातून पुढे आले आहे. कोणत्याही अडथळ्याविना महामार्गावर सरळ रेषेत गाडी एकाच वेगात अनेक मिनिटं धावते तेव्हा मेंदूही क्रिय़ेच्या प्रक्रियेसाठी सक्रीय नसतो. त्याला महामार्ग संमोहन म्हणतात.