गणेशोत्सवात चोरट्यांचा धुमाकूळ, 9 फ्लॅटमध्ये चोरी

गावी गेलेल्या लोकांच्या घरात चोरी

Updated: Sep 14, 2018, 01:41 PM IST
गणेशोत्सवात चोरट्यांचा धुमाकूळ, 9 फ्लॅटमध्ये चोरी

गुहागर : ऐन गणपती उत्सवात गुहागरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शृंगारतळी शहरातले एकाच रात्री 9 फ्लॅटमध्ये चोरट्यांनी चोरी केली आहे. शृंगारतळी येथीस निळकंठ पार्क आणि गोल्डन अपार्टमेंट मधील जी लोकं गावाला गेली आहेत त्यांच्या घरी ही चोरी झाली आहे. 

सर्व फ्लॅट मधील रहिवासी गणपतीसाठी आपआपल्या गावी गेल्य़ाने चोरांना संधी मिळाली. गुहागरमधील आजपर्यंतची ही सर्वात मोठी घरफोडी ठरली आहे. यानंतर गुहागर पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ माजली आहे. गुहागरच्या शहरवासियांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे.