बायकांचे कपडे घालून घरफोड्या करणाऱ्याला पोलिसांनी असं शोधून काढलं, पाहा व्हीडिओ

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चोरटे काय-काय शक्कल लढवतात, याचं हे सावध करणारं उदाहरण.

Updated: Sep 21, 2021, 10:42 PM IST
बायकांचे कपडे घालून घरफोड्या करणाऱ्याला पोलिसांनी असं शोधून काढलं, पाहा व्हीडिओ title=

विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : सध्या चोरटेही अपग्रेड झालेत. चोरी करण्याचा नवनवीन मार्गच हे चोरटे तयार करत असतात. काही दिवस चोरी करण्याच्या नवीन पद्धतीमुळे हे चोर यशस्वी होतात. पैसा, सोनं हवं हवं ते चोरी करतात. प्रत्येक चोराची चोरी एखाद दिवस पकडलीच जाते. तो चोर कितीही हुशार असो, पण एखाद दिवशी यांचा बाजार उठतोच. हे भुरटे चोर पोलिसांच्या तावडीतून सुटत नसतात. बातमी अशाच एका चोरट्याची आहे.  (thieves used to wear gowns to steal at Aurangabad see video)

हा चोरटा चक्क महिलांचे कपडे घालून चोरी करायचा. पण अखेर याचं बिंग फुटलंचं. हा सर्व प्रकार कुठला आहे, पोलिसांनी या चोरट्याला कसं शोधलं, जाणून घेऊयात.

हा सर्व प्रकार आहे मराठवाड्यातील औरंगाबादमधील. हल्ली चोरी तसेच अनेक गुन्ह्यांचा उलगडा सीसीटीव्ही फुटेजमुळे होतो. आपण चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये दिसू नये, यासाठी हा पठ्ठ्या चक्क गाऊन घालून चोरी करायचा. नईम उर्फ चुन्नू उस्मान शहाअसं या चोरट्याचा नाव. काही दिवस याने पोलिसांना चकवा दिला. मात्र गुन्हेहगाराचा अडकवणार नाहीत, ते पोलिस कुठले. 

सीसीटीव्हीमध्ये किंवा प्रत्यक्षदर्शींनी कुणी बघितलंच, तर आपली ओळख पटू नये यासाठी तो चक्क बायकांचा गाऊन आणि वर स्वेटर, कानटोपी असा पेहराव करून घरफोड्या करत होता. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्यानं ही युक्ती केली.

काही काळ पोलिसांची दिशाभूल झालीही. मात्र पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात लंगडत चालायचं नाटक करत असताना चुन्नू सापडला आणि त्याचं बिंग फुटलं. 

चुन्नूनं गाऊन घालून चोऱ्या करत असल्याची कबुली दिली आहे. मात्र पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चोरटे काय-काय शक्कल लढवतात, याचं हे सावध करणारं उदाहरण.