तुकाराम मुंढे यांचा काम करण्यास स्पष्ट नकार, नगरसेविका संतप्त

 तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनीधी यांच्यात विकासकामांच्या मुद्द्यावरुन वाद होताना दिसत आहे. 

Updated: Jul 1, 2018, 05:11 PM IST
तुकाराम मुंढे यांचा काम करण्यास स्पष्ट नकार, नगरसेविका संतप्त title=
छाया - संग्रहित

नाशिक : पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनीधी यांच्यात विकासकामांच्या मुद्द्यावरुन वाद होताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेकवेळा तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप होत आले आहेत. आता येथे विकासकामांवरून वाद झाल्याचे पुढे आलेय. विद्यमान नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्यातही विकास कामांवरुनच आयुक्‍तांबरोबर शाब्दीक चकमक झाली. नागरिकांसोबत आयुक्‍तांच्या भेटीला गेलेल्या डॉ. पाटील यांना तुमची कामे होणार नाही, असे स्पष्ट सांगितल्याने वादाला तोंड फुटले.

मागील वर्षाच्या नगरसेवक निधीतून नगरसेविका डॉ. पाटील यांच्या प्रभागातीाल दहा ते बारा कामे मंजूर झालेली आहेत. त्याबाबत केवळ आदेश निघणे बाकी आहे. यामुळे संबंधित कामे करण्यात यावी, अशी मागणी डॉ. हेमलता पाटील यांनी करत प्रभागातील काही नागरिकांना बरोबर घेऊन आयुक्‍तांच्या भेट घेतली. त्यावेळी कामे होणार नाहीत, असे आयुक्‍तांनी स्पष्टपणे सांगितले. यामुळे डॉ. पाटील संतप्त झाल्यात. याबाबत 'पुढारी' ने वृत्त दिलेय.

फाईल मंजूर असताना कामे का होणार नाहीत. लोकांना आम्ही उत्तरे काय देणार असे पाटील यांनी आयुक्‍तांना प्रत्युत्तर केले असता नागरिकांनी मनपाकडे ऑनलाईन तक्रारी कराव्यात नगरसेवकांकडे जाण्याची गरज नाही, असे उत्तर आयुक्‍तांनी दिल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्‍त केली. नगरसेवकांनी देखील मनपाच्या मोबाईल अ‍ॅपवर ऑनलाईन तक्रारी कराव्यात त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले. 

यावेळी पाटील म्हणाल्यात, कामेच होणार नाही असे कसे म्हणता येईल. गरजेची कामे मंजूर करून त्यांचे मनपाने ऑडीट करावे, अशी सूचना पाटील यांनी केली. मात्र, आयुक्‍तांनी संबंधित कामे होणार नाहीत. शहरात मलवाहिका आणि जलवाहिनी यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून, शहरात एकाच वेळी एलईडी फिटींग लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नाही. अंदाजपत्रकाव्यतिरिक्‍त कोणतेही काम होणार नाही, असे आपण त्यांना सांगितले. अन्य कामांना नी नकार दिल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलेय. तर आम्ही जी मंजूर कामे आहेत. त्यांना प्राधान्य देऊन ती करण्याची मागणी केली. मात्र,  त्यांची कामे न करण्याचीच भूमिका असल्याने वाईट वाटले त्यावरुनच वाद झाला, असे नगरसेविका डॉ. हेमलता पाटील स्पष्ट केलेय.