धुळ्याचा गुंड गुड्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

धुळ्यातील गुंड गुड्याच्या हत्येप्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Updated: Jul 29, 2017, 01:44 PM IST
धुळ्याचा गुंड गुड्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक  title=

धुळे : धुळ्यातील गुंड गुड्याच्या हत्येप्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजा भद्रा आणि छोटा पापा अशी त्यांची नावं आहेत. धुळे शहराच्या मुख्य बाजारपेठ भागात राजा भद्रा गँगने कुख्यात गुंड गुड्याची अमानुष हत्या केली होती.  

गेल्या अकरा दिवसापासून याप्रकरणी पोलीस ११ मुख्य आरोपींच्या शोधात होते. सुरुवातीला पोलिसांना काही साथीदार पकडण्यात यश आलं. मात्र राजा भद्रा आणि छोटा पापा याला अटक करण्यात यश मिळत नव्हतं. अखेर राजा भद्रा आणि छोटा पापा याला पोलीसांनी इंदूरमधून अटक केलीय. हे दोघं गुड्याच्या खुनात मुख्य आरोपी आहेत. आतापर्यत गुड्याच्या खुन प्रकरणात पंधरा जणांना अटक करण्यात आलीय.