मक्याच्या पिकाला लावलेल्या औषधाने घेतला चिमुकल्यांचा बळी

मक्याच्या पिकाला लावलेल्या औषधाच्या संसर्गामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शिवानी कदम आणि शिवराज कदम या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 23, 2017, 07:55 PM IST
मक्याच्या पिकाला लावलेल्या औषधाने घेतला चिमुकल्यांचा बळी title=

सातारा : मक्याच्या पिकाला लावलेल्या औषधाच्या संसर्गामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शिवानी कदम आणि शिवराज कदम या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

 तीन-चार दिवसांपासून मुले आजारी

संपूर्ण शरीरात विष भिनल्यामुळे दोन्ही बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तीन-चार दिवसांपासून शिवानी आणि शिवराज हे दोघेही आजारी होते. मात्र, ते नक्‍की कशामुळे आजारी पडले याची माहिती त्यांच्या आई-वडिलांनाही नव्हती. 

औषधाची बाटली तिथेच

ही मुले आजारी पडल्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया की विषबाधा झाली याची चर्चा सुरू होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कदम कुटुंबीयांनी घराच्या एका स्टोअर रुममध्ये मक्याला औषध लावून औषधाची बाटली तिथेच ठेवली होती.

आई-वडिलांनाही औषधाचा संसर्ग

दोन दिवसांनंतर स्टोअर रुमचा दरवाजा उघडल्यानंतर औषधाचा संसर्ग दोन्ही मुलांना आणि आई-वडिलांना झाला.