नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प नाही - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांची नाणारमध्ये जाहीर सभा

Updated: Apr 23, 2018, 03:52 PM IST
नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प नाही - उद्धव ठाकरे title=

नाणार : रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणारमध्ये तेलशुद्धीकरणाचा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. हवं तर नाणारसोबत जैतापूरचा प्रकल्पही नागपूरला किंवा गुजरातला न्या... पण कोकणात प्रकल्प नको असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मोदी-शाह जोडीवर तोंडसुख घेतलं. विरोधात बोललं की देशद्रोही ठरवलं जातं असा टोला त्यांनी भाजपला लगावला. तर जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा सुभाष देसाई यांनी नाणारच्या सभेत केली. 

उद्धव ठाकरे परदेशात असताना केंद्र सरकारनं शिवसेनेला अंधारात ठेऊन, सौदी अरेबियातल्या कंपनीबरोबर या प्रकल्पासाठी कराराला मंजुरी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. त्याआधी हा प्रकल्प बळजबरीने राबवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण मंत्रीपद सोडू अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घेतली होती. त्यामुळे आता शिवसेनेने विरोध आणखी तीव्र केल्याने भाजप आता काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलं आहे. भाजप जर प्रकल्पाबाबत 
ठाम असेल तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.