वंचित बहुजन आघाडीला धक्का, ४८ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

वंचित बहुजन आघाडीला जोरदार धक्का 

Updated: Feb 22, 2020, 08:28 PM IST
वंचित बहुजन आघाडीला धक्का, ४८ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम शिरसकर, वंचितचे महाराष्ट्र राज्य सचिव नवनाथ पडळकर, देखरेख समिती प्रमुख अर्जुन सलगर यांच्यासह ४८ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये या पदाधिकाऱ्यांचा महत्वाचा वाटा राहीला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राजीनामा दिलेले अनेक पदाधिकारी हे वंचित सोबत सुरवातीपासून आहेत. विविध जाती जमातीमधील पदाधिकाऱ्यांचा समावेश सुरुवाती पासूनच राहीला आहे. पण आज यातील मोठा गट बाहेर पडला आहे. पक्षातील विश्वासार्हता संपल्यामुळे राजीनामा देत असल्याचे या पदाधिकऱ्यांचे म्हणणे आहे. 

राजीनामा दिल्यानंतर या पदाधिकाऱ्यांची पुढील वाटचाल काय असेल ? याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.